_

_

Pages

Navigation Menu

शिवजन्मोत्सव !!!

शिवजन्मोत्सव !!!
गडवाट_परिवार !!!
१९ फेब्रुवारी २०१५ !!!


साडे तीनशे वर्षानंतर सुद्धा फक्त ज्यांच्या नामघोषातुन लाखो जनांचा छातीचा भाता फुलतो अन एक मराठा लाख मराठा बनतो त्या युगपुरुष क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवरायांचा जन्मदीन  !!!  हाची दिवाळी  दसरा ... ह्यापेक्षा ही मोठा दिवस खर तर ह्या दिवसाला उपमा नाहीच ....  प्रत्येक मराठ्याच्या ह्रदय सिंहासनावर राज्य करणार्या शिवरायांचा जन्मदिवस !!!! फक्त हा दिवस साजरा करण्याची  पद्धत मात्र वेगळी ....


१९ फेब्रुवारी २०१२ - माईंचा आश्रम 
१९ फेब्रुवारी २०१३ - सातारा रिमांड होम
आणि १९ फेब्रुवारी २०१५  - आधारतीर्थ  आधाराश्रम नाशिक 
प्रत्येक वेळी आपल वेगळेपण   जपणारा आपला गडवाट  परीवार !!!

  पहाटे आश्रमात पोहचल्यावर दिसलेली ती चिल्लिपिल्ली त्यांच्या चेहर्यावर असणारा उत्साह आणि त्यांची चाललेली कार्यक्रमाच्या तयारीची गडबड आनंद देणारी होती पण एवढ्या लहान वयात त्यानी ज्या परस्थितीचा  करावा लागलेला सामना आणि त्यांची ती कोवळी वये डोळ्याच्या कडा पाणवल्याशिवाय  राहिल्या नाहीत. अवघी  ३ ४ वर्षाची चिमुकली बाळ .... ज्यांच्या आई वडिलांनी परस्तिथि समोर हार मानली असेल पण ह्यांच्या उरात असणारी उमेद मात्र थक्क करणारी होती, ह्यानी परस्थितीला  हरवलय असच म्हणेन मी !!!

   शिवरांयांच्या मूर्ती पुजनाने , महाराजांच्या जयघोषात, बालचमुंच्या टाळ मृदुंगात त्रिंबकेश्वराच्या प्रांगणातुन राजांची मिरवणुक सुरु झाली.  तोच जल्लोष, तोच रुबाब आणि तीच शिस्तसुद्धा !!! भान राखुन बेभान होण्याची ती वेगळीच  मजा !!!

मिरवणुकी नंतर पोवाडा ,प्रमुख पाहुणे प्रमोदजी गायकवाड यांचे मार्गदर्शन तसेच योगेशजी नागर यांचे व्याख्यानाने शिवरायांची निरनिराळी  रुपे  उघडुन दाखवली.



   व्याख्याना नंतर आम्ही गडवाटकरी  ज्या गोष्टीची कायम वाट पाहत असतो ते म्हणजे  इतिहासाची भुक वाढवनारे  आणि एकाच घटनेचा सर्व बाजुंनी विचार करायला शिकवणारे  दादारावांचे  मार्गदर्शन .



तिथे राहणाऱ्या एक लहान ताई तिच्या मनोगतामध्ये एक वाक्य बोलली अन गर्व वाटला मी गडवाट परीवाराचा भाग आहे याचा.
                                 ते वाक्य असे..."आमच्या आश्रमातील बंधूभगिनींचा एक एक
                                                     दिवस कमी व्हावा व तुम्हा सगळ्यांना ते आयुष्य लाभवे व
                                                     तुमच्या हातून शिवकार्य समाजकार्य घडावे"
हे वाक्य ऐकताच सर्वांच्या डोळ्याच्या कड़ा पाणावल्या.........

शेवटी एकच विचार डोक्यात घोळत  घरी पोहचलो शेतकर्यांच्या   आत्मह्त्येन  मुल तर पोरखी  झालीच होती पण लाखांच्या पोशिंदा असणार्या ह्या बळी राजाच्या जाण्यान समाज पण कुठ ना कुठ तरी पोरका होतोय .....


                                                    ।। सळसळत राहु दे मर्द मराठ्यांचे रक्त ।।
                                                    ।।  आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त ।।


#गडवाट_परिवार _/\_ 
#एक_गडवाटकरी


शिवजन्मोत्सव !!! एक क्षण......




0 comments: