पंढरी भटक्यांची पंढरी ....हरिश्चंद्रगड !!!
कुठल्याही भटक्यांसोबत असल की हमखास विषय निघणार तु अजुन हरिश्चंद्रगडला गेला नाही अजुन ??? कोकणकड़ा एकदा तरी बघा ... खुप दिवस डोक्यात होत पण कृतीत काय उतरत नव्ह्त. रतनगड आणि संधन करून जवळ जवळ तीन महीने होत आले होते. त्यानंतर मी सिंहगड आणि पुरंदर करून आलो होतो. पण म्हणावा असा ट्रेकचा प्लान बनत नव्हता.ग्रुप वर चर्चा चालूच होती. आणि ग्रुप च नाव बदलल गेल हरिश्चंद्र !!! तारीख पक्की झाली. २७ फेब्रुवारीला रात्री निघायच.
२७ फेब्रुवारीला सकाळपासुन चार वेळा फोन येउन गेले होते लग्नाला येतोयस ना ??? वर्गातल्या मित्राच लग्न ... मित्रांचे फोन येतच होते ... त्यात अजुन भर म्हणुन की काय उद्या मंगेश भैयाच्या मुलीचा पहिलाच वाढदिवस आहे...
पण माझ मन कधीच धाऊ लागल होत ... रस्ता जरा ओळखीचाच पुणे नारायनगाव आळे फाटा, ओतुर, ब्राह्मनवाडा ......आणि आता हरिश्चंद्रगड. सह्याद्रीच आणखी एक देखण रूप ... पंढरी ट्रेकर लोकांची पंढरी !!! पाच दिवसांच्या एसी अन पीसी च्या जगात जगत असताना कायम वाट बगितली जाते शुक्रवारची !! म्हणजे किंबहुना मी तरी पाच दिवस आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांची वाट बघतच घालवतो.
शुक्रवारी (२७ फेब्रु.) सगळ साहित्य जमा करून रात्री ९.२०च्या लोकलनेच कासारवाडी स्टेशनला पोहचलो सुद्धा वेळेच्या आधी एक तास. जरा आपली जवळची माणसं भेटणार म्हणल की आपण लवकरच पोहचतो की ! ठरलेल्या नियमानुसार ह्यावेळीसुद्धा बस भोसरीतुनच रंगभुमीला (विशाल सावंत) घेऊन सुटणार होती. ह्यावेळी पिंकी (आमची बस बरका !!) नसल्यान जरा धाकधुकच होती. ह्यावेळचा ट्रेक जरा खास होता आमच्या आर के (राहुल कराळे) भाऊंचा वाढदिवस स्पेशल. शिवाजीनगरपासुन बाकी पुणेकर मंडळींना घेण्यासाठी रंगभुमी आणि मी घेउन निघालो. बस भारी होती पण ड्राइवर मामांच गणित जरा अवघड दिसत होत. आर के अन मित्र मंडळ आधीच हजर होते.आता आम्ही वाट पाहत होतो ओंकार दादांची. ओंकार नायगावकर ज्यांच्या कडुन कट्टरता काय अन शिवप्रेम हे शिकावे ते ओंकारदादा ! दादांची भेट झाली ...गळाभेट !!! अम्या अन रोहन काही कारणामुळे येणार नव्हते. बाकी नवले पाटिल दादा, रविदादा डेरे दाखल झाले. तरी अजुन फारेस्ट चा पत्ता नव्हता. रंगभूमीच्या कृपा आशिर्वादाने तोपर्यंत आइसक्रीम फस्त केल .आणि फारेस्टची स्वारी आली सोबतीला होते महाड वरून खास ट्रेकसाठी आलेले निरंजन दादा. आणि रात्री ११ वाजता शिवरायांच्या जयघोषात आमची गाडी निघाली. एक लग्न आणि एक वाढदिवस अगदी पद्धतशीरपणे चुकउन आमची स्वारी हरिश्चद्राकडे निघालेली !!
रात्रीचा प्रवास म्हणल की चित्र असत अंताक्षरी न गाण्यांच्या भेंड्या. पण आमच जरा वेगळ असत इथ रात्रभर इतिहासाचा जागर केला जातो. अन ह्यावेळी तर ओंकार नायगावकर नावाच चालत बोलत पुस्तक बरोबर होत. नारायणगावात सुप्रसिद्ध मसाले दूध घेउन आमची गाडी पुढ निघाली. ओतुर फाटयावर मुंबईकर आमची वाट बघत शेकोटी पेटउन बसले होते. जिद्दी (रवी दादा ) ,अनंता पल्याड (अमित),जयदीप, अन जिद्दिंच्या भाषेत शेक्या (शेखर दादा) आम्हाला जॉइन झाले. आता पूर्ण झाल होत ऐकत नाय मित्र मंडळ !!!
ओतुरपासुन डावा घ्या,उजवा घ्या करत आमची गाडी चालली होती. ऐकत नाय ला न ऐकनारे ड्राइवर मामा भेटले होते. आणि त्यांच्या नादात आमचा रस्ता चुकला. आमची गाडी कोणत्या तरी एका वाडीच्या हनुमान मंदिराजवळ उभी होती रात्रीचे अडीच वाजले होते. आता रस्ता विचरायला गावातल्या कुणाला उठवायचे म्हणजे मार खायची लक्षण !! त्यातुन मार्ग काढत जिद्दी अन आर के खाली उतरले. स्वप्निल दादांच्या जी पी एस न मोलाची साथ दिली. आणि सकाळी साडे चारच्या सुमारास पाचनई गावात पोहचलो.
गडावर जाण्यासाठी भरपुर वाटा आहेत त्यापैकी ही त्यातली त्यात जरा बरी वाट.पायथ्याला असतानाच सर्व सुचना दिल्या गेल्या.अजुन सूर्योदय व्हायला दोन ते अडीच तासांचा अवधी होता. एकदम काळाकुट्ट अंधार होता. शिवरायांची आणि शंभुराजांची गारद देऊन चढनीला सुरुवात केली. सगळीकडे ट्रेक लीडर पुढे चालतात आणि बाकीचे त्यांच्या मागे पण आमच्याकड उलट असत आमचे लीडर सर्वात मागे थांबुन सर्वाना सोबत घेऊन चालतात आता त्यांच नाव सांगत नाही पण किंबहुना त्यांच्यामुळेच माझ्यासारखे आळशी लोक ट्रेक पूर्ण करू शकतात. सुरुवातीला अगदी जोशात मी पहिल्या नंबरवर चालु लागलो. हा पहिला नंबर जास्त वेळ टिकणार नव्हता ही गोष्ट वेगळी !!! नाही म्हणजे अगदीच दमतो अस नाही पण मित्रांबरोबर गप्पा मारत चालायला आवडत अस समजा. पंधरा वीस मिनिट चालल्यावर एकदम खडी चढन लागली तशी मला मित्रांची आठवण झाली अन मी मागे आलो. दोन्ही बाजुला किर्र झाडी आणि मधुन पाऊलवाट असा मार्गक्रम चालला होता. थोडस पुढ गेल्यावर एकदम खडी चढन आहे,पण बाजुला लोखंडी रेलिंग लावली आहेत सुरक्षेकरता वनविभागाच्या सौजन्याने...
हा भाग ओलांडुन पुढ गेल की दिसत सह्याद्रीच रौद्र रूप ...डाव्या हाताला ९० अंशात सरळ नजर जाते तिथपर्यंत काळा खडक अन उजव्या बाजूला खोलच खोल दरी. आता थोड दिसायला लागल होत सह्याद्रीच ते देखण रूप डोळ्यात साठवत चाललो होतो. पुरेसा उजेड नसल्यामुळे कँमेरे अजुन बंदच होते. ह्याच कड्याजवळ आवाजाला येना-या प्रतिध्वनींचा आवाज वेड लावणारा होता. एकदा दिलेला आवाज कितीतरी वेळा माघारी येत होता. मग काय पुन्हा एखादा घुमला दरी कपारीत शिवरायांचा जयघोष !!!
आमच्या आवाजाने पक्षी जागे झाले असावेत बहुदा कारण थोडे पुढे जाताच खुप वर्षानी पक्षांचा असा किलबिलाट ऐकायला भेटला. खर तर इथुन पाय निघत नव्हते पण सूर्योदय पाहण्यासाठी पुढे माथ्यावर जायचे होते. ह्या घळीतुन पुढे चढन लागते जी आपल्याला पठारावर घेऊन जाते.इथुन जे भास्कररावांनी आकाशाची किनार भगवी करत जे स्वर्गीय दर्शन दिले ते शब्दात मांडणे जमणार नाही.
भास्कर दर्शनानंतर समोर होते हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदीर आणि पुष्करणी. ह्याच भागात छोटी छोटी खुप मंदिरे आणि गुहा आहेत ज्या आजही आपल अस्तित्व टिकउन आहेत.
पुष्करणी |
इथ जास्त वेळ न दवडता आमचा मोर्चा वळवीला कोकणकड्याकडे...ज्या बद्दल खुप काही ऐकल होत त्याला आज प्रत्यक्ष पहायच होत. निसर्गाचा एक आगळा वेगळा अविष्कार !!!
स्वर्ग असाच असेल ना !!!! #कोकणकडा #kokankada |
जिद्दींच्या शब्दात...
'' पहावे अन पहातच राहावे तहान, भूक आणि थकवा सार काही ह्या जागेवर उभे राहिल्यावर माणूस विसरून जातो. स्वर्गाचे वर्णन पुराणांमधे केले आहे ते जर अनुभवायचे असेल कोकणकडा अनुभवा. ऊन सावल्यांचा खेळ, वार्याची बासरी, गिधाडांची गगनभरारी, पक्ष्यांचा किलबिलाट, दिवसाही दिसणारी कड्याखालील गावांच्या अंगावर धुकाची चादर आणि बरेच काही जे शब्दात सांगता येणार नाही.''
कोकणकडा पाहून सर्वानी सोबत आणलेल पोटात ढकलल आणि तिथच पडी मारली. इथच ओंकार दादांनी पहिली हास्यकल्लोळाची मैफिल भरवली. हवेतला गारटा वाढत चालला होता. थंडी मुळ दुपारी एक वाजता सुद्धा झाडाखाली बसन कठिन जात होत म्हणुन मी पुन्हा कड्यावर मोर्चा वळवला. दुसर्या ग्रुपच प्रस्तारोहन (rappling) चालु होत मी तीथ जायच्या आधीच ओंकार दादांनी तिथल्या लोकांना सुद्धा कब्जात घेतल होत माणस जिंकन्यात ह्या माणसाची तोड नव्हती.
पावसाचे वातावरण तयार झालेले खोट्या अंदाजासाठी प्रसिद्ध हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरणार अस दिसत होत. कोकण कड्यावर मुक्कामाचा आमचा बेत फसला. सर्वजण मुक्कामासाठी मंदिराच्या वरच्या बाजुला असणार्या गुहेकड़े आलो गुहा कसली ऐस पैस ३ BHK घरच !! अश्या खुप लेण्या वजा गुहा आहेत. मंदिरातसुद्धा राहण्याची सोय होते. आधी ठिपक्यात पडनारा पाऊस आता मुसळधार बरसु लागला होता. बैठकीच्या खोलीत साहित्य टाकुन आम्ही आता रात्रीच्या पोटोबाच्या तयारीला लागलो होतो. फारेस्ट न झुगाड करून अगदी पद्धतशीर लाइट्ची सोय केलेली. समोरच्या व्हरांडयात फारेस्ट न चुल पेटवली. बाहेर पाऊस चालूच होता.
पावसाचे वातावरण तयार झालेले खोट्या अंदाजासाठी प्रसिद्ध हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरणार अस दिसत होत. कोकण कड्यावर मुक्कामाचा आमचा बेत फसला. सर्वजण मुक्कामासाठी मंदिराच्या वरच्या बाजुला असणार्या गुहेकड़े आलो गुहा कसली ऐस पैस ३ BHK घरच !! अश्या खुप लेण्या वजा गुहा आहेत. मंदिरातसुद्धा राहण्याची सोय होते. आधी ठिपक्यात पडनारा पाऊस आता मुसळधार बरसु लागला होता. बैठकीच्या खोलीत साहित्य टाकुन आम्ही आता रात्रीच्या पोटोबाच्या तयारीला लागलो होतो. फारेस्ट न झुगाड करून अगदी पद्धतशीर लाइट्ची सोय केलेली. समोरच्या व्हरांडयात फारेस्ट न चुल पेटवली. बाहेर पाऊस चालूच होता.
पहिला मेनु होता च्याव म्याव सुप. आर के च्या पाककलेतुन आमच्या समोर आलेल्या पहिल्या डिश वर बाहेर पडनारया पावसात सर्वांच्या तोंडी दोनच शब्द होते आ हा हा कडक !!!! त्याआधी जिद्दींसोबत मंदिरांचा एक अभ्यास दौरा झाला.आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालु झाली. मेन्यु एकदम फक्कड होता शाही बिर्यानी व्हेज बर का !! आर के न अगदी काडी पेटी पासुन लोनच्यापर्यंत सगळ साहित्य न चुकता आणल होत. त्याच्याच अध्यक्षतेखाली जेवण तयार होऊ लागल. प्रत्येकान आपआपल काम अगदी व्यवस्थित पार पाडल. बिर्यानी नंतर पापड भाजले गेले हो पापडच !!! ऐकत नाय च काम असच असत. बिर्यानी बर गावरान तुप, पापड आणि लोणच !!! बेत एकदम फक्कड जेवणाची सुरुवात एवढ्या शांततेत कशी करणार ???? म्हणून त्याआधी गजल आणि कविता !!! आमचे प्रसिद्ध कवी वि.ल.सावंत आणि अनंता पल्याड !!!
बिर्यानी वर अगदी उभा आडवा हाथ मारून आम्ही आलो शेकोटी पुढे. बाहेर धो धो बरसतच होता. नेहमी प्रमाणे शेकोटी गाजनारच होती. ओंकार दादांची सायकल वरून केलिली रायगड वारी आजचा मुख्य विषय. त्यांचे अनुभव प्रवासात भेटलेली माणसे खुप काही शिकवून गेली. अभिमानाने छाती तर फुललीच पण काही प्रसंगावर डोळ्यातुन आपसुक अश्रु कधी आले समजलेच नाही. राजांची जनमानसात आजही जो आदर आणि आपुलकी आहे ह्याची ती पोचपावती होती. त्यानंतर प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले. शेकोटी वरून उठुन कधी निद्राधीन झालो समजलच नाही.
बिर्यानी वर अगदी उभा आडवा हाथ मारून आम्ही आलो शेकोटी पुढे. बाहेर धो धो बरसतच होता. नेहमी प्रमाणे शेकोटी गाजनारच होती. ओंकार दादांची सायकल वरून केलिली रायगड वारी आजचा मुख्य विषय. त्यांचे अनुभव प्रवासात भेटलेली माणसे खुप काही शिकवून गेली. अभिमानाने छाती तर फुललीच पण काही प्रसंगावर डोळ्यातुन आपसुक अश्रु कधी आले समजलेच नाही. राजांची जनमानसात आजही जो आदर आणि आपुलकी आहे ह्याची ती पोचपावती होती. त्यानंतर प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले. शेकोटी वरून उठुन कधी निद्राधीन झालो समजलच नाही.
दुसर्या दिवसाची (रविवार) सुरुवात पाऊस आणि धुक्यातच झाली. पाऊस धुक
आणि वारा यांचा जोरदार खेळ चालु होता. एका पाटोपाठ येउन समोरचे दृश्य बदलत होते.
हरिश्चंद्रेश्वराच मंदीर क्षणात पावसात न्हाहत होत. तर क्षणात धुक्यात हरवत होत. दिसणार दृश्य अगदी मनाला वेड लावणार होत. आणि अश्या वातावरणात शिवरायांचा जयघोष होणार नाही शक्यच नाही !! पोरानी आवाजानी पुर्ण गड जागता केला. ह्यानंतर छोटासा फोटोशुट उरकून आम्ही महादेव मंदिराकड वळालो. एका गुहेत छाती एवढ्या पाण्यात असणार शिवलिंग भुरळ पडणार आहे.
हरिश्चंद्रेश्वराच मंदीर क्षणात पावसात न्हाहत होत. तर क्षणात धुक्यात हरवत होत. दिसणार दृश्य अगदी मनाला वेड लावणार होत. आणि अश्या वातावरणात शिवरायांचा जयघोष होणार नाही शक्यच नाही !! पोरानी आवाजानी पुर्ण गड जागता केला. ह्यानंतर छोटासा फोटोशुट उरकून आम्ही महादेव मंदिराकड वळालो. एका गुहेत छाती एवढ्या पाण्यात असणार शिवलिंग भुरळ पडणार आहे.
मंदिरातून आम्ही गुहेकड निघालो. Breakfast Time.... गरमागरम कांदे पोहे ... अगदी घरची आठवण करून देणारे आणि तेवढ्याच
प्रेमाने बनवलेले अर्थातच आर के च्या अध्यक्षतेखाली !!! नंतर सगळ उरकून सगळी गुहा
साफ करून चालु केला परतीचा प्रवास !!!
बाप्पा ..... |
काल पहाटे थंडीत चालु केलेला प्रवास काल
दुपारच उन अंगावर घेउन आज धुक्याच्या चादरी खालून पावसात चिंब भिजत चाललो होतो. दोन दिवसात तीन ऋतु जगुन
आम्ही निघालो होतो. काल जातानाच्या धुळीच्या वाटा आज चिखलाने माखल्या
होत्या...
. मंदिरावरिल शिल्प कला ... |
सगळ क्रेडिट : आपलेच ऐकत नाय मित्र मंडळ.
अजुन फोटो बघायचेयेत येतोय घेउन लवकरच !!!!
आता कस जायच ? काय घेउन जायच ? ते विचारा की गुगल ला.....
------------------------------------------------------- अभिजीत कदम ------------------------------------------------------
0 comments: