_

_

Pages

Navigation Menu

दुर्गजागर

बोम्बल्या फकीरान  पुन्हा एकदा सुंबरान मांडलय , काढा पटापट  आपापली घोडी... दामटा गडाकड अन होऊन जाउदे गडकोटांचा जागर !!! उघडा आपापला खजिना अन येउदे जगासमोर आपल्या राजांचे गडकिल्ले !!!!
घुमु दे पुन्हा एकदा सह्याद्रीच चांगभल.... गडकोटाच  चांगभल .. 
आणि चालु झाला दुर्गजागर ... आता फेसबुकवर काही दिवस पुन्हा एकदा गड-कोटांचा जागर बघायला भेटणार होता. प्रत्येकाच्या वेगळ्या नजरेतून किल्ल्यांचे वेगवेगळे भाग माहीतीसह अभ्यासायला मिळणार  होते.  अगदी रायगडापासुन ते जिंजीपर्यंत !!!

ह्यावेळी एकाच विषयावर फोटो टाकायचे अस ठरवलेल .... ठरल वेगवेगळ्या किल्ल्यांची महाद्वार .... पाच दिवस ... पाच किल्ले ... पाच महाद्वार .... सुरुवात ??? सुरवात तर रायगडाच्या महादरवाजापासूनच ....

पायवाटेने वर पोहोचल्यावर महादरवाजा समोर उभा ठाकतो. फसव्या प्रवेशदाराचा हा एक उत्तम नमुना म्हणता येईल. गोमुखी बांधणीमुळे आक्रमणकर्त्याला एका चिंचोळ्या आणि वळणदार मार्गाने पुढे जावे लागते तेव्हा कुठे खरे प्रवेशदार दिसते. वळलेल्या मार्गामुळे दारावर धडक देण्यासाठी हत्तीचा किंवा इतर साधनांचा उपयोग करता येत नाही. महादरवाज्यावरती कातळात पाण्याची दोन खोदीव टाकी आहेत. याचा उपयोग महादरवाजात  असणारया लोकांच्या दैनंदिन वापरासाठी होत असावा. खालून पाहताना तर समोरच्या बलाढ्य बुरुजांमुळे प्रवेशदार दिसतच नाही.  दुसरी महत्वाची गोष्ट  म्हणजे महादरवाजा आला म्हणजे गडमाथा  आला अस नाही. महादरवाजा  आजही त्यावेळच्या  बांधकामशास्त्राला मनोमन मुजरा घालायला लावतो.
#मनात_पुजिन_रायगडा


महादरवाजा

रायगडच्या महादरवाज्यानंतर आता राजगडचा पाली दरवाजा. स्वराज्याच्या अनेक मोहिमा ह्याच दरवाज्यातून निघाल्या. अनेक लढाया मारून  राजे ह्याच दरवाज्यातून आले असतील.हाच स्वराज्याच्या सुखदुखा:चा साक्षीदार !!!


राजमार्गाने वर आल्यावर लागणारा हा पाली दरवाजा... पाली दरवाजा आपल्याला पद्मावती माचिवर घेउन जातो ...इथ दोन खालचा आणि वरचा असे दरवाजे आहेत. खालचा दरवाजातून येणारी वाट पूर्णपणे वरच्या दरवाज्याच्या माराच्या टप्प्यात आहे. किल्ल्यात प्रवेश करताना उजव्या हाताला खडी चढन आणि डाव्या बाजुला दरी अशी रचना इथेसुद्धा पाहायला मिळते. अस या वाटेचं स्वरूप, तुम्हाला वाटेल यात काय विशेष पण "किल्ल्या वर हल्ला झालाच तर गनीम खालून वरती येणार अश्या वेळेस गनीमाच्या उजव्या हाथात तलवार असणार, गडावर येणाऱ्या वाटेच्या उजव्या बाजूला कडा आणि डाव्या बाजूला दरी, गनिमाला तलवार तरी फिरवता येईल का? आणि तलवार फिरवलीच तर डाव्या बाजूला आधार घ्यायला काही  नसल्याने तो दरीत कोसळणार "

जगातील इतिहासकारांनी नोंद घ्यावी असा हा राजगड...


राजगडचा पाली दरवाजा


रतनवाडीचा रतनगड... वाडीत अमुतेश्वराचा रहिवास .... अन पाठीशी रतनगड  !!!

हनुमान दरवाजा !!!
रतनवाडीतुन शिड्यांच्या वाटेने रतनगडावर आल्यावर पहिल्यांदा लागतो गणेश दरवाजा, तो ओलांडून पुढ आले की दोन फाटे फुटतात एक गुहेकडे जातो तर दूसरा आपल्याला हनुमान दरवाजाकडे घेउन जातो. एका बाजुचा बुरुज  थोडा  पडझड झालेला पण अजुन व्यवस्थित असणारा हनुमान दरवाजा. डाव्या बाजुला हनुमानाचे तर उजव्या बाजुला गणपतीचे  शिल्प कोरलेले आहे. मागे जो बाहेर आलेला दिसतोय तो कात्राबाईचा कडा. पुढ गेल्यावर गोल बुरुज लागतो. तिथुन दिसणारा नजारा कोकणकड्याची  आठवण करून  देतो. हनुमान दरवाजा खरया अर्थाने गडावर प्रवेश मिळवुन देतो. रतनगड वरचाच अखंड पाषाणातला  त्रिंबक दरवाजा पाहण्यासारखा आहे.


हनुमान दरवाजा, रतनगड


तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार किल्ले सिंहगड !!!
जिथ हाताच्या ढाली करुन मरहट्टे   लढले धारातीर्थ पडले ...ज्यानी मराठ्यांचे रौद्ररुपी तांडव बगितले ...जिथ जिवाची पर्वा न करता घरदार विसरून   प्राणांची आहुती दिली ....आधी लगीन कोंढाण्याचे , मग माझ्या रायबाचे असे म्हणत लढता लढता तानाजी मालुसरे ज्या किल्ल्यावर धारातीर्थी पडले तोच " किल्ले सिंहगड..."

कल्याण दरवाजा, सिंहगड !!!
थोडासा वेगळा प्रयत्न ....





लोहगड ... स्वराज्याची तिजोरी .... लक्ष्मी कोठिची श्रीमंती...विंचुकाट्याचा देखनेपणा  आणि तटबंदिचा रुबाब .....
दुर्गजागर मधला हा पाचवा फोटो लोहगडावरून  ....
महादरवाजा, लोहगड !!!
गडावर चढताना एकूण चार प्रवेश्द्वार लागतात,हा मार्ग सर्पाकार असून शेवटच्या द्वारातून खाली पहिले असता अजोड सर्पाकार रचना दिसून येते हेच लोहगडाचे मुख्य आकर्षण आहे. सर्वप्रथम लागतो तो -

गणेश दरवाजा :- असे सांगितले जाते कि या दरवाजाच्या बुरुजाखाली सावळे कुटुंबियांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली. त्यानंतर-
नारायण दरवाजा :- हा दरवाजा नाना फडणवीस यांनी बांधला.येथील भुयारात भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत.
हनुमान दरवाजा :-हा दरवाजा सर्वात आधी बांधला गेला.
महादरवाजा :- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे,यावर मारूतीरायाचे शिल्प कोरलेले आहे. 


0 comments: