_

_

Pages

Navigation Menu

रणधुरंधर शंभुराजे बलिदान दिन




घात झाला राजं, घात झाला ....
वय वर्ष ३२ अवघ ३२ वर्षाच वय, हे जाण्याच वय मुळीच नव्हत राजं ...
९ वर्षाच्या कारकिर्दीत घोड्याच्या पाठीवर सिंहासन ठेऊन सिंव्हासारख राज्य करणार्या माझ्या  राजाच वय अवघ ३२.....

त्या दगडात देव असतो म्हनत्यात काही जनाना भेटलाय म्हण... असतो का नाय ते काय मला पण ठाव नाय ...पण कधी भेटलाच कुठ तर त्याला विचारल्या बिगर सोडणार नाय त्या औरंग्यासारख्या राक्षसी हैवानाला ८० वर्ष ...अन ज्यान लेकरासारखी जनता संभाळली त्याला फक्त ३२ वर्ष ?? तुझी अन्याय करण्याची सवय काय अजुन गेलीच नाय न्हव ??? 
अस का घेउन गेलास ? हे नाय विचारणार कारण मराठे कधी मरणाला भीले नाहीतच. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजुनच आम्ही जगलोय... 

 त्याला उत्तर तर द्यावच लागल कारण त्यानं त्याची मराठ्यांच्या  देव्हार्यातली जागा कधीच हरवलीया इथ फक्त आता राज तुमचीच जागा हाय !!! जिथ त्यो हारलाय तिथ मानवरूपी   माझा राजा जिंकलाय !!! हो माझा राजाच जिंकलाय !!!



भिमा इंद्रायणी तिरी, वढु-तुळापुर संगमावरी |
मुत्यृंजय संभाजी पाहुन, मुत्यृ हि थिजला ||






राजांच स्मारक बघुन कोणी कवी एक वाक्य बोलुन गेलाय....
  
कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा...


वढु येथील शंभु महाराजांच  स्मारक


मुजरा धाकल धनी मुजरा ...
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!!

११ मार्च, रणधुरंधर शंभुराजे बलिदान दिन...


-----------------------------------------------------अभिजीत कदम---------------------------------------------------

0 comments: