एकच धुन सहा जुन !!!! आमच धनी छत्रपती होणार ...गुलामगिरीच्या अखंड विळख्यातुन धरणीला मुक्त करत भूपती होणार... पित्याच्या मायेने जनतेला संभाळलेले आमचे धनी खर्या अर्थाने प्रजापती होउन गरीब भोळ्याभाबड्या जनतेवर मायेच छत्र धरणारं आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार ...स्वराजाच्या रोहिडेश्वराच्या समोर घेतलेली शपथ पूर्ण करत स्वराज्य निर्मित अखंड हिंदुस्तानात सत्ता गाजवनार्या उन्मत्त सत्तेला नेस्तानाबुत करत श्रींच राज्य पुर्नत्वास येणार आणि आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार ... तानाजी येसाजी बाजीच स्वप्न पूर्ण होणार... लहानपणी मांडलेला गडकोटांचा खेळ पूर्ण होणार आमच राज सिंहासनाधिश्वर होणार... आऊ साहेबांनी बघितलेल स्वराज्याच स्वप्न पूर्ण होणार ... शहाजी राजंचा मुद्रा भद्राय राजते चा आशीर्वाद खरा होणार आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार .....
गड कोटांनो, तटा बुरुजांनो या .... हिमालया ये सह्याद्री जवळ येउन तिचा आनंद बघ ये...सप्तनद्यानो या ..... साता समुद्रानो ..... या अवघे अवघे या.... आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार ....
ठरल... नगारखान्यासमोर नंग्या तलवारी नाचवायच्या.... ढोल ताशाच्या तालावर बेधुंद होउन नाचायच ... गड भगवा झालेला बघायचा.... भान राखुन बेभान व्हायच खुप दिवसापासुनच स्वप्न ... राज्याभिषेक याची देही याची डोळा बघायचा म्हणजे भाग्याच...रायगडा च्या उत्सुकतेन रात्री न लागलेली झोप ... पहाटे चारलाच बाहेर पडलो आणि चार पाच किलोमीटरवर पावसान गाठल, थांबुन पाउस थांबण्याची वाट बघत बसलो.
पाउस काय थांबेना आणि मला काय धीर धरवेना मग भर पावसात आमची स्वारी निघाली रायगडाकड. रायगडाकड जायची म्हणजे एक वेगळीच ओढ असते. तम्हिनीतुन जाताना दिसणार अप्रतिम सह्याद्रीच सौंदर्य डोळ्यांत साठवत चाललो. वाहणारे ढग सह्याद्रीला कवेत घेत होते अधुन मधुन पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या. निसर्गपण जणु राज्याभिषेकाच्या आनंदात सहभागी होत होता. निजामपुर ते पाचाडच्या रस्त्यावरून जाताना भन्नाट सह्याद्रीच दर्शन पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पाडत होत.अचानक गाडी चालवताना अगदी चार पाच फुट अंतरावरून डाव्याबाजूने एक घार जोरात उजव्या बाजुच्या खोल दरीत उडाली, तो नजारा बघण्यासारखा होता. चार पाच सेकंदांचा घोळ झाला आणि आमची गळाभेट होता होता राहीली.
पाउस काय थांबेना आणि मला काय धीर धरवेना मग भर पावसात आमची स्वारी निघाली रायगडाकड. रायगडाकड जायची म्हणजे एक वेगळीच ओढ असते. तम्हिनीतुन जाताना दिसणार अप्रतिम सह्याद्रीच सौंदर्य डोळ्यांत साठवत चाललो. वाहणारे ढग सह्याद्रीला कवेत घेत होते अधुन मधुन पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या. निसर्गपण जणु राज्याभिषेकाच्या आनंदात सहभागी होत होता. निजामपुर ते पाचाडच्या रस्त्यावरून जाताना भन्नाट सह्याद्रीच दर्शन पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पाडत होत.अचानक गाडी चालवताना अगदी चार पाच फुट अंतरावरून डाव्याबाजूने एक घार जोरात उजव्या बाजुच्या खोल दरीत उडाली, तो नजारा बघण्यासारखा होता. चार पाच सेकंदांचा घोळ झाला आणि आमची गळाभेट होता होता राहीली.
जसजसा रायगडजवळ येईल तसा आतुन येणारा आनंद वेगळाच होता. पाचाड जवळ आल तशी गर्दी जाणवु लागली. डोक्यात एकच विचार घुमत होता काय वातावरण असेल हो ह्याच राज्याभिषेकाच्या आधल्या दिवशी ह्या इथ ??? रोहिडेश्वराच्या समोर शपथ घेणारे शिवबाराजे उद्या सिंहासनाधिश्वर होणार होते. तोरन्याच तोरण बांधुन सुरु झालेल स्वराज्य रायगडावरयेइपर्यंत एक साम्राज्य झाल होत. प्रत्येकाच जीव की प्राण झाल होत. स्वराज्याच्या ह्या अग्निकुंडात अनेकांच्या प्राणांची आहुती दिली होती. सगळ्यांच एकच सोनेरी स्वप्न होत स्वराज्य आणि त्याचच फळ स्वरुप रायगडावर बत्तीस मन सोन्याच सिंहासन साजर झाल होत. पाचाडात आऊसाहेबांना मुजरा करून रायगडा कड मोर्चा वळवला. देशमुखांच्या खानावळीत पोटाची आग विजवुन. रज्जु रथाजवळ जिवलगांची आणि आमचा नंबर येण्याची वाट बघत बसलो. दोन दिवसासाठी ताकद वाचवून ठेवायची होती.
हिरकणी बुरुजावरून सरळ राजसदरेत धन्याला मुजरा करायला... गड गजबजला होता सदरेपासुन होळीच्या माळावरुन जगदीश्वरापर्यंत जिकडेतिकडे गर्दीच गर्दी खरच राजधानी भासत होता आज रायगड. बाजारपेठ गजबजली होती. पूर्ण गडावर धन्याचा जयघोष... गड भगवा झालेला... जगदीश्वराच आणि महाराजांच दर्शन घेउन कोल्हापुरकरांचा पाहुनचार घेण्यासाठी जिल्हा परिषदेची इमारत घाठली ... शिवशक्ति प्रतिष्ठान च्या मावळयांना खरच त्यांच्या कामासाठी मनापासुन मुजरा घालावासा वाटला अन्नछ त्रा ची जबाबदारी अगदी मनापासुन संभाळलेली.... ऐकत नाय मंडळासोबत खिचडी आणि आमटी भातावर येथेच्छ ताव मारला... ह्या जेवणासमोर फ़ाइव स्टार भी झक मारतीय की हो... एक पत्रावळी आणि किती हाथ काय मोजले नाहीत....
सायंकाळी चार पाच च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच ढोल ताशा आणि तुतारींच्या गजरात झालेल आगमन... डोळ्याच पारण फेडणारा तो क्षण.... किल्ल्यावर त्या दिवशी असणारी लाईट व्यवस्था अप्रतिम होती ... विजयी मनोरे प्रकाश झोतात न्हाहुन निघत होते. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काय सजला असेल रायगड याची कल्पना करत होळीच्या माळावर वेडयागत फिरत बसुन घालवलेला तो वेळ.... गड राबता ठेवा हे महाराजांचे शब्द जागेपणी स्वप्नात बघत होतो. गडावर मुंगीसारखी माणस .... अंगावरची बदललेली कापडं सोडली तरी हाथातल्या तलवारी ... प्रत्येकाच्या चेहरया वरचा ओसंडून वाहणारा आनंद ... प्रत्येकाची आपापल्या परीन चालेलेली घाई... पूर्ण गडावर घुमणारा महाराजांचा जयघोष .. ... वर भरून आलेल आभाळ ... होळीच्या माळावरून बघितल्यावर राजसदरेवर वाहणारे रंगीत ढग (लाईटमुळ झालेले नाहीतर स्वप्नात जगता हां आमच्यावरचा ठपकाच).... बाजारपेठ भरून वाहत होती.... येणारे येतच होते.... गर्दी वाढतच होती.... काय जादु आहे ह्या नावाची ??? माणुस मेल्यावर १२ दिवस जुलमान आठवण ठेवणारी हीच माणसाची जात आज साडे तीनशे वर्षानसुद्धा एका नावावर जगतात.... एका नावाखाली जमतात... जमलेल्या प्रतेकाच्या डोक्यात एकच शब्द घुमत असणार .... शिवराय शिवराय आणि फक्त शिवराय ...
वार्यावर फडफडणारे भगवे आजही माझ्या राजाची महती सांगतायेत...दरबारात चाललेली शाहिरी आणि पोवाडे... अंगाला बोचणारी पण हवीहवीशी वाटणारी थंडी... बाजारपेठेत निरभ्र आभाळाखाली पिठल भाकरीवर मारलेला ताव...चांदण्यात एका बाजुला जगाचा ईश्वर आणि दुसर्या बाजुला आमचा परमेश्वर...झोपेसाठी जागेची मारामारी आणि पायरीवर झोपुन काढलेली आर्धी रात्र... आणि सोन्याचा दिवस उजाडला.
नगारखान्यात नगाडा घुमला, फडकला भगवा गगनावरी,
बाहु पावले स्पुरण , जयघोष छत्रपतींचा तळपल्या नंग्या समशेरी .
ढोल ताशाच्या गजरात.... मोठ्या उत्साहात... चककनारी तलवारीची पाती.... सासनकाठ्या भंडारा.... भगवा गड.... शाही मिरवणुका... महाराजांचा सुवर्णमुद्रानी केलेला अभिषेक ...धनी सिंहासनाधिश्वर झाल .... सोहळा याची देही याची डोळा..... आम्ही भाग्यवंत .... अपुरे शब्द ....
0 comments: