विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
विठ्ठल विठ्ठल ..... ज्ञानेश्वर माउली.... अन तुकोबारायांच्या जयघोषात देहभान विसरून जिवाला लागलेली असते आस त्या पांडुरंगाला भेटण्याची ..वारी.... .. ही परंपरा महाराष्ट्राची,अस्मिता महाराष्ट्राची ... देहुतुन तुकोबाराय आणि आळंदीतुन ज्ञानेश्वर माउलींना सोबत घेउन निघालेला वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीला विठुरायाच दर्शन घ्यायला पोहचतो. घरदार संसार विसरून प्रत्येक वारकरी वारी जगतो. खर तर वारी हां लिहण्याचा किंवा वाचण्याचा विषय असु शकतो अस मला तरी अजिबात नाही वाटत वारी ही प्रत्येकाने अनुभवावी प्रत्येकाने जगावी..... वारी हा जगण्याचा विषय तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जगावीच... वारीची पुण्याच्या मुक्कामात आणि दिवे घाटात टिपलेली काही क्षणचित्रे ...
|
चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
0 comments: