का वाजवता ??? काय मिळत तुम्हाला ढोलताशे वाजवुन ??? अगदीच शुद्ध शिकलेले अशिक्षित असतील तर ते म्हणतील फुकटच ध्वनीप्रदुषण..तर काहीजण अगदी पुढचा मागचा विचार न करता हुल्लडबाजीचा ठपका लाऊन मोकळे... असो बाप्पा येणार म्हणल की मग तुम्ही काहीही अगदी कसही बोला आम्हाला ते ऐकु येतच नाही. आमच्या डोक्यात एकच झिंग असते ती म्हणजे ताशावर मनमुराद बरसनार्या काडीची, ढोलाच्या पानावर अगदी पुर्णपणे ताकदीने तरंग उठवनार्या टिपराची अन आकाशाशी स्पर्धा करणार्या त्या भगव्याची... पण खुप जणांसाठीचा प्रश्न काय मिळत ??? आता काय मिळत ते शब्दात कस सांगणार आणि ते सांगुन कस समजणार ? ढोल ताशा शब्दात मांडण्याचा विषय नव्हेच हा जगण्याचा विषय बघा तुम्ही पण जगुन कधीतरी मिळतील तुम्हालाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे .... कारण आम्ही वाजवतो फक्त आमच्या बाप्पासाठी , आम्ही वाजवतो आमची मर्हाटमोळी परंपरा जपण्यासाठी, आम्ही वाजवतो आमच्या बाप्पाला हक्काने नाचवण्यासाठी अन् ढोल ताशाची संस्कृती जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचवन्यासाठी ...
बाप्पाला निरोप दिल्यावर घरात ठेवलेल टिपरू अगदी दिसेल तेंव्हा अगदी आठवण होईल तेंव्हा हातात घेउन फिरवून बघनारच, पुढच्या वर्षी नवीन काय करता येईल हा विचार कायम वर्षभर चालुच असणार. हेडफोन मधे कोणतही गाण लागो आपसुक तुमचे हाथ टेबलाला ढोल समजुन ठेका धरणारच अन् त्यातुनही मोरया मोरया, माउली माउली नाहीतर पहील नमन लागल की मग पर्वणीच आवाज वाढणार अन तुम्ही शेजारच्याच्या हमखास शिव्या खाणार ... अगदी रस्त्याने एकटेच चालला असाल तर भजनीचा मांडीवर थापीन कधी वादन चालु कराल ते तुम्हालाही समजत नसेलच... खुप विचार न करता सगळ्या आठवणी आल्याच ना कारण आपल्यातला वादक वर्षभर वादकच असतो. अनंत चतुर्दशीच्या दुसर्याच दिवशी 354 days to go...असा फेसबुकवर स्टेटस टाकणार आमच लहान मुलाच मन तेवढ्याच आतुरतेन बाप्पाची वाट बघत असतो एवढ मात्रखर...... बाप्पा येतायेत.....
#वादकोत्सव_२०१५
दोन महीने आधीपासुन चालु होणारी लगबग अगदी दोर्या ताणन्यापासुन ते टिपरू बनवुन घेण्यापर्यंत ... नखात जाउन बसणार गोन आणि ढोल तानताना दोरीबरोबर जाणारी हाताची कात, कमरेभोवती दोरीचे वळ, तळहातावर आलेले फोड, शरीराचा एकनएक दुखणारा भाग एक आपसुकच आतल्याआत आनंद देत असतो कारण बाप्पासोबत असतो. लहानपणी शाळा सुटून कधी घरी पोहचतोय अस वाटणार ते ''फिलींग" फक्त आणि फक्त ह्याच दिवसात पथकाच्या ओढीन मिळत. वेळेप्रसंगी कॉलेजला दांडी मारून ऑफिसात बॉसला कल्टी मारून जो तो हजर.... जसजस बाप्पा जवळ जवळ येतील तसतस ऑफीशियली आजारी पडण्याच प्रमाणही वाढत जात. दिड दोन महिन्याच्या कसुन केलेल्या सरावानंतर ओढ असते ती बाप्पाच्या समोरच्या पहिल्या वादनाची. पहिल्यांदाच वादन करणारे अगदी पूर्ण अभ्यास करून सुद्धा पेपरच्या आधी जशी मनस्थिती असावी तश्या अवस्थेत तर जुने वादक मात्र मागच्यावर्षी वातावरण कस भारी होत हे अगदी रंगवुन सांगण्यात मग्न असतो. आणि आपसुकच मित्रमंडळीतुन प्रश्न सुरु होतात मग तुम्ही यंदा कुठ ?? तुम्ही कुठ वादन करणार ?? आम्ही ह्या मानाच्या गणपतीला तुम्ही कुठ ??? ते लक्ष्मी रोडला असतात तुम्ही कुठ ?? पण प्रत्येक वादकासाठी सगळ एकासाठीच चाललेल असत ते म्हणजे त्या बाप्पासाठी..सगळे कष्ट सगळी मेहनत त्या बाप्पासाठी मग कोणता मोठा अन कोणता छोटा हे ठरवणारे आपण कोण ?? लक्ष्मीरोडच च म्हणाल तर तीथ वादनाची नशा वेगळीच पण आमच्यासाठी आम्ही कुठही वादन करो लक्ष्मीरोड एवढ्याच आत्मियतेन करतो एवढ मात्र खर .....
हे दिड दोन महीने आम्ही आमच्याच दुनियेत जगत असतो. मित्र भेटले की ''अरे जिवंत आहेस का ??" टोमना ठरलेला पण खरतर ह्याच दिवसात आम्ही जगतो हो ... अगदी मनसोक्त मनाला वाटल तस अगदी राजेशाही थाटात... बाप्पा समोरच्या वादनाची पहिली वेळ असो वा शंभरावी उत्सुकता तेवढीच ... पहिल्या दिवशी ताशाच्या तर्रीनंतर ढोलावर पडणारा पहीला ठोका ते अलका चौकातला शेवटचा फक्त आणि फक्त बाप्पासाठीच ....दोन महिन्याच्या मेहनतीला सोनेरी झालर लागते ती ह्याच दहा दिवसात. पहिल्या दिवशी ढोल ताणण्यापासुन अनेक नवनवीन मित्र जोडले जातात काही कामापुरतेच पण काही मात्र जिवाचे जिवलग होतात. दहा दिवसातला एक एक क्षण सोनेरी बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न.
हे दिड दोन महीने आम्ही आमच्याच दुनियेत जगत असतो. मित्र भेटले की ''अरे जिवंत आहेस का ??" टोमना ठरलेला पण खरतर ह्याच दिवसात आम्ही जगतो हो ... अगदी मनसोक्त मनाला वाटल तस अगदी राजेशाही थाटात... बाप्पा समोरच्या वादनाची पहिली वेळ असो वा शंभरावी उत्सुकता तेवढीच ... पहिल्या दिवशी ताशाच्या तर्रीनंतर ढोलावर पडणारा पहीला ठोका ते अलका चौकातला शेवटचा फक्त आणि फक्त बाप्पासाठीच ....दोन महिन्याच्या मेहनतीला सोनेरी झालर लागते ती ह्याच दहा दिवसात. पहिल्या दिवशी ढोल ताणण्यापासुन अनेक नवनवीन मित्र जोडले जातात काही कामापुरतेच पण काही मात्र जिवाचे जिवलग होतात. दहा दिवसातला एक एक क्षण सोनेरी बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न.
बाप्पाच्या सहवासात दहा दिवस कसे जातात समजत नाही आणि उजाडतो अनंत चतुरदशीचा, ह्या दिवशीची मनाची अवस्था वेगळीच असते वादनाला प्रत्येकजण तयार प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा असतो, बाप्पाला खुप नाचवायच असत पण मनात एक गोष्ट बोचत असते बाप्पाला निरोप द्यायचा असतो. त्याला खुप नाचवायच असत पण घालवायच नसत. लक्ष्मी रोडवर पाउल जड होतात जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा वेळ घ्यायचा असतो. शगुन चौकात धिंगाना घालुन पुढ निघतो आणि जाणवु लागत वेळ कमी कमी होत असतो अलका चौक जवळ येत असतो, लक्ष्मी रोडवरच वादन प्रत्येक वादकाची स्वप्न पण हे पूर्ण करताना बाप्पाला निरोप द्यायची वेळ जवळ आलेली असते.... अलका चौक जसजसा जवळ येइल तस पुर्ण ताकतीन पडणार टिपरू तुला डोळ्यात साठवुन घेताना डोळ्यात जमा होणार पाणी बाप्पा तुझ नि माझ नात सांगुन जात... वर्षभर पुरेल एवढा आनंद देऊन जाताना मात्र कायम रडवुन जातोस... बघ पुढच्या वर्षी लवकर ये आणि जमल तर जरा मोठी सुट्टी घेउन ये....
#बाप्पा_लवकर_या
#रुद्रगर्जना_२०१५
तात्पुरता थांबतोय हा प्रवास तर असाच चालु राहील.....
#गणपती_बाप्पा_मोरया
# लवकर_या
#बाप्पा_लवकर_या
#रुद्रगर्जना_२०१५
तात्पुरता थांबतोय हा प्रवास तर असाच चालु राहील.....
#गणपती_बाप्पा_मोरया
# लवकर_या
0 comments: