_

_

Pages

Navigation Menu

रंगीला राजस्थान !!! भाग १ पुर्वतयारी


२०१४ ला निरोपाची ट्रिप महाराष्ट्राच्या बाहेर काढायची. मागच्या वर्षी पाच दिवस कोकणात घालवले म्हणन्यापेक्षा गाजवले होते. पाच दिवस बाईक वर कोकण पिंजुन काढला होता. अगदीच येणारया नवीन वर्षाचे स्वागत वगेरे असल कौतुक नाही पण येणार्या सलग सुट्ट्यांचा सदुउपयोग म्हणा हव तर.... तसही हल्ली भटकायला कोणत्या कारणांची गरज हल्ली लागतच नाही. अगदी जुलै ऑगस्ट पासुन चर्चा मेलामेली चालु झाली होती.  कधी जायच हे ठरल होत पण कुठ हे लवकर ठरत नव्हत. आणि सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता येणार कोण कोण ???? त्यासाठी लीगली पूर्ण ग्रुप ला मेल टाकण्याच काम विनयन  अगदी पद्धतशीर केल. विनय आमच्या ग्रुप चा असल्या बाहेरच्या उचापतीसाठीचा मँनेजर !!! खरतर हा मेल फक्त वातावरण तापवन्यासाठीच होता कारण कुठ जायच हे अजुन तरी ठरल नव्हत. बारा जणांना  मेल गेले. जायच कुठ हा प्रश्न अजुन तसाच होता. घरचे मागच्याच वर्षी केरळला जाउन आलेले तिकडचे फोटो बघुन केरळ माझ्या डोक्यात घुमत होत. तशी मी विन्याला पण पीन मारली आणि आमच सर्चिंग चालु झाल. काहिकेल्या केरळ आमच्या बजेट मधे बसेना. बजेट वाढल तर तर येनार्यांची संख्या कमी होणार होती. त्यामुळ पुन्हा कधीतरी जाऊ अस म्हणुन केरळला बगल दिली. दूसरा पर्याय होता राजस्थान  !!!

राजस्थान  !!!
काय बघणार तिकड ??? काय आहे वाळवंटात ?? असे सल्ले देखिल आले पण नेहमीप्रमाणे विट्टी उडवावी तस उडवून लावले. आनंदाची गोष्ट म्हणजे कुठ हा प्रश्न मिटला. मी खुश होतो म्हणजे प्लानमधे दोन तीन किल्ल्यांचा समावेश होता आणि बरच काही इतिहासासंबंधी बघायला मिळणार होत. राजस्थानात कुठ ?? जोधपुर आणि जैसेलमेर !!! फायनली डन !!!

मेलामेलीत बाराजण असले तरी शेवटी संख्या पाच सहाच असणार हे माहीत होत. रेल्वेच बुकिंग करण गरजेच होत त्यामुळ कोण कोण येणार हे लवकर ठरन गरजेच होत. अंदाजाप्रमाणे जे येणार होते तेच आले. तरी सुट्ट्यांच अजुन मिळतील की नाही  माहीत नव्हत. दोन तीनच  सुट्ट्या लागणार होत्या इतर दिवस सुट्ट्यांचेच होते. आता पुन्हा मेलामेली येणारे To मधे बाकी Cc मधे !!! सहाजण तयार झालो. विनय व्यास ट्रिप मँनजर, नरेश मालविया राजस्थानला जायच म्हणुन जरा जास्तच खुश, सद्दाम शेख कुठपण आणि कधिपन यायला कायम तयारअभिजीत मेस्त्री कायम फिरायला पुढ पण हयावेळी हानुनमारून  नाव  लिहलेल  आणि  प्रितम सुतार शेवट पर्यंत हो हो म्हणणार आणि शेवटच्या वेळेत कलटी देणार खुप वेळचा अनुभव. फायनली सहाजणांच तिकीट बुकिंग झाल, नेहमीप्रमाणे वेटिंग लिस्टमधे..... २९ नोव्हेंबर ला मल्हारगडावर असताना विनयचा मँसेज आला ... ticket confirmed ...आणि फोटोपण. जोधपुर एक्सप्रेस .... २९ डिसेंबर २०१४... संध्याकाळी ६ वाजुन ५० मिनटांनी !!!



 पण सगळ सरळ रेषेत झाल तर मग फिरन कसल ??? अभ्याला सुट्टी मिळत नव्हती. वीकेंडला पण काम कराव लागणार होत, इच्छा असुनही त्याला बेत रद्द करावा लागला. अमोल यायला तयार होता तसा उत्साही पण जरा जास्त मोटीव्हेट करावा लागणारा अमोल पठारे. अमोलला तळ्यातुन मळ्यात आणण्याची जबाबदारी सिडभाइनी ( ह्या ट्रिप मधील सद्दामच नाव ...पिक्चरवाला फोटोग्राफर सिड ... आमचे फोटो चांगले काढावेत म्हणुन !! ) अगदी व्यवस्थित पार पाडली. आता सगळ सुरळीत होत. तोपर्यंत आठ दिवस आधी प्रितम बाबांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी बाँम्ब टाकला. गावची यात्रा असल्याने येणार नाही. आमच्या भाषेत नेहमीप्रमाणे टांग मारली. प्रितमने टाकलेला बाँम्ब पद्धतशीरपणे बाकीच्यांनी माझ्यावर फोडला. सहापैकी एक सीट मोकळी प्रवास करणार होती.
पुन्हा नविन व्हाटस् अप ग्रुप .....ढीगान मँसेज.... मेलामेली... आणि 

नियोजनाच्या नावाखाली निव्वळ खेचाखेची !!! सगळ्यांना व्यवस्थित सुट्ट्या मिळाल्या होत्या फक्त सद्दामला आजारी पडाव लागणार होत. सगळी तयारी व्यवस्थित झाली. घरूनपण  परवानगी  मिळाली.  म्हणजे थोडासा हट्ट केला की ती मिळतेच.  
३० तारखेला  ऑफिस करून  ट्रेन पकडायची होती. त्यामुळे विनय साहेबांनी स्टेशनपर्यंत खास कँबची सोय केलेली. एक तास आधीच चौघेजण स्टेशनला पोहचलो. ट्रेन यायच्या आधी दहा मिनिट नरेश पोहचला. 
आणि आवाज आला, "जोधपुर एक्सप्रेस प्लाटफॉर्म क्रमांक तीन पर आ रही है । " हा तीन नंबरच मला आठवतय.... आता सेल्फी तो बनता है .....

डावीकडुन  विनय, सद्दाम, मी, नरेश, अमोल


to बी continue.....

0 comments: