१ जानेवारी आजपासुन खरया फिरण्याची सुरुवात होणार होती. सकाळी लवकरच म्हणजे साधारण नऊ वाजता आवरून बाहेर पडलो. पेटपुजेसाठी धाड घातली जनता स्वीट होम वर .. एक से बढकर एक पदार्थ ... एकाएकाची टेस्ट करत जवळ-जवळ नाश्त्याबरोबर आम्ही जेवणही उरकून घेतल. तोपर्यंत काल ठरवलेली गाडी आली आणि आमचा जोधपुर दर्शन प्रवास सुरु झाला.
उमेद भवन पँलेसपासुन सुरुवात करून रात्री सूर्यास्त मेहरानगडवरून बघायचा असं ठरलेल ..
उमेद भवन पँलेस...
एकोनविसाव्या शतकाच्या सुरुवातीला पडलेल्या दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून ह्याचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. उमेद सिंह यांच्या नावाने ही वास्तु बांधण्यात आली. १९२९ साली चालु झालेले बांधकाम १९४३ साली पूर्ण झाले. हेनरी वॉर्न या इंग्रज अभियांत्याने त्याची स्थापत्यकला पूर्ण पणाला लाउन ह्याची उभारणी केलिय. त्याने तयार केलेली स्केचेस आणि ड्राइंग आजही आपणास तिथे बघायला भेटतात. उमेद भवन हे जगातील मोठ्या खाजगी निवासापैकी एक आहे. तब्बल ३४७ खोल्या तिथ आहेत. सध्या उमेद भवन तीन भागात विभागल गेलय एका छोट्या भागात संग्रहालय, दुसर्या भागात
होटेल आणि तिसर्या भागात राजा उमेद सिंह यांचे वंशज गजसिंह राहतात. इथ असणार जुन्या चार चाकी गाड्यांचा ( vintage car collection ) असलेल संग्रहालय पाहन्यासारख आहे.त्याची भव्यता खालील फोटोमधुन लक्षात येतच....
मंडोर किल्ला
मंडोर जोधपुरपासुन पूर्वेला ९ किमी. वर असणारी मारवाड राज्याची जुनी राजधानी. नंतरच्या काळात राव जोधा यांनी जोधपुर शहराची स्थापना केली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव राजधानी नंतर बांधलेल्या मेहरानगड किल्ल्यावर हलवली. आजही आपणास राठोड शासकांच्या समाध्या इथ पहावयास मिळतात. येथे असणारी ऐतिहासिक बाग आजही एकदम व्यवस्थित जतन केलेली आहे. इथ गेल्यावर फक्त माकडांपासुन सावध रहा !!!
जसवंत थडा - राजा जसवंत सिंह द्वितीय (१८३७-१८९५) यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र राजा सरदार सिंह यांनी ही वास्तु बांधली. राजा जसवंत सिंह ह्यांच्या आधी राजघराण्यातील लोकांचे अंतिमसंस्कार मंडोर मधे होत असत. जसवंतसिंह ह्यांच्या इच्छे नुसार त्यांचा अंतिमसंस्कार देवकुंडच्या किनारी करण्यात आले.लाल दगडाच्या चबुतर्यावर संगमरवरामध्ये ही वास्तु बांधलीय. ह्या समाधिच्या परिसरात अजुन काही राजे आणि रान्यांच्या समाध्या आहेत. कारंज्यांची विविधपुर्ण रचना आणि फूल झाडांमुळे समोरचा बगीचा उठुन दिसतो. आत प्रवेश केल्यावर एक मोठी खोली आहे जी दोन भागात विभागलीय एका भागात राजांची चित्र आणि दुसर्या भागात जसवंतसिंह यांची समाधी आहे. इथुन मेहरानगड अगदी विलोभनीय दिसतो. ही वास्तु आणि मेहरान गड यांना जोडनारया रस्त्यावर जोधा राव यांचा पुर्नाकृती पुतळा आहे.
मेहरानगड किल्ला - जोधपुर शहराची शान असणारा हां किल्ला राव जोधा यांनी बांधला आणि राव जोधा यांच्यानंतर सुद्धा ह्या किल्ल्याचा विस्तार होत राहिला. सुरुवातीच्या काळात दोन महाद्वार असणारा किल्ल्याला आता आठ महाद्वार आहेत जो राठोड राजघरान्याचा पाचशे वर्षांचा इतिहास सांगतो.मंडोरनंतर हा किल्ला राठोड साम्राज्याचा केंद्रबिंदु राहिला. किल्ल्याच नाव सुर्यावरून पडलय ते कस तर सूर्य म्हणजे 'मिहिर'(संस्कृत शब्द) , मिहिरला राजस्थानी भाषेत मेहर अस म्हणतात आणि राठोड राज्यकर्ते स्वत:ला सुर्यवंशी मानत म्हणुन मेहरानगड!!!
किल्ल्यात जाताना गाइड घ्याच त्यामुळे भरपूर माहिती भेटते. आणि गाइड जरी नाही घेतला तरी प्रत्येक ठिकाणी माहितीफलक लावलेले आहेत. गाइड नसेल तर तुम्हाला किल्ल्यात हवा तितका वेळ फिरता येत हा एक गाइड न घेण्याचा फायदा होतो. किल्ल्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी इथ आता लिफ्ट बसवली गेलीय.
जयपोल आणि फतेहपोल ही महाद्वार अनुक्रमे जयपुर आणि मुघली सेनेवर मिळवलेल्या विजयाची प्रतिक म्हणून बांधली गेलियेत.वर असणार्या तोफा आजही ताकतिची जाणीव करून देतात. इथ असणार संग्रहालय हे भारतातील मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. इथ आपणास वेगवेगळी हत्यार, युद्ध पोशाख, पालख्या, पाळणे , जुनी नानी, जुन्या तोफा, वस्त्र,चित्र (पेंटिंग्स) बघायला मिळतात.
जयपोल आणि फतेहपोल ही महाद्वार अनुक्रमे जयपुर आणि मुघली सेनेवर मिळवलेल्या विजयाची प्रतिक म्हणून बांधली गेलियेत.वर असणार्या तोफा आजही ताकतिची जाणीव करून देतात. इथ असणार संग्रहालय हे भारतातील मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. इथ आपणास वेगवेगळी हत्यार, युद्ध पोशाख, पालख्या, पाळणे , जुनी नानी, जुन्या तोफा, वस्त्र,चित्र (पेंटिंग्स) बघायला मिळतात.
इथ असणारे वेगवेगळे महाल पाहन्यासारखे आहेत ज्या मधे झाकी महल, शीश महल, मोती महल, फुल महल यांपैकी काहींची छायाचित्रे खाली जोडत आहे.
झाकी महल
शीश महल
मोती महल
फुल महल
एका दालनात एका जर्मन कलाकारने काढलेले दुर्गादास राठोड यांचे बोलके चित्र आहे. हेच दुर्गादास छत्रपती संभाजी महाराजांकडे औरंगजेबाविरुद्ध लढन्यासाठी मदत मागायला आले होते राजकुमार अजितसिंह यांना बरोबर घेउन. अजीतसिंह हे जसवंतसिंह पहिले यांचे पुत्र. जे मिर्जाराजांसोबत मराठ्यां विरुद्ध चालुन आले होते आणि मराठा फौजेने त्यांची दानादान उडवली होते ते राजा जसवंत सिंह !!! ही माहिती न विसरता गाइडच्या माहितीत मी सांगुन टाकली.
साधारणत: पाचच्या सुमारास किल्ला पूर्ण फिरून झाला . ढगाळ वातावराणामुळे किल्ल्यावरुन सूर्यास्त बघायचा बेत फिसकटला. पण किल्ल्यातुन पुर्ण निळ दिसणार जोधपुर शहर आकर्षक वाटत होत.
किल्ल्यावरून दिसणारा क्लॉक टॉवर
किल्ल्याच्या पायथ्याला असणार्या कँफेत मस्त नाश्ता करून आम्ही मेहरानगडला निरोप दिला. वेळ भरपुर असल्यामुळे गाडीवाल्याला बाय बाय करून पायी यात्रा चालु केली. रस्ता नेहमीप्रमाणे माहितच नव्हता. GPS आणि विन्या असल्यान हॉटेल शोधण अवघड नव्हत. गल्लीबोळ पार करत दिड दोन तास फिरत फिरत हॉटेलवर पोहचलो.
एवढे राजवाडे पाहिले पण काहीतरी अपुर्ण असल्यासारख वाटत होत. त्यात सगळ असुन काहीतरी नसल्या सारख वाटत होत. शेवटी न राहुन फेसबुक वर स्टेटस पडलाच.... फीलिंग मिसिंग ..... " थाट राजेशाही पण राजगड रायगडीची आपुलकी नाही" अहो कितीही काहीही झाल तरी आमच इमान फक्त रायगडाच्या मातिशीच !!!
राजस्थानात आलोय तर राजस्थानी दाल-भाटी वर ताव मारलाच पाहिजे. पुन्हा शोधमोहीम चालु ....काल पाल हवेली आणि आज दाल-भाटी साठी स्पेशल एक छोटेखानी हॉटेल.... दाल-भाटी देसी घी में.... त्यानंतर रबडी आणि स्पेशल राजस्थानी कुल्फी .... कुल्फी खात खात हॉटेलपर्यंत पायी वारी...... दिवस सुफल संपन्न !!!!
0 comments: